Lonavala : कुणेनामा अंगणवाडी शाळेला खेळणी व वजनकाटा भेट

एमपीसी न्यूज : कुणेनामा ग्रामपंचायतीच्या वतीने अंगणवाडी शाळेला मुलांकरिता खेळणी वजनकाटा भेट देण्यात आला. तसेच 14 व्या वित्त आयोगातून  ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील महिला व मुलींकरता विविध स्वरूपाचे कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामपंचातीच्या वतीने नुकतेच ठाकरवाडी या आदिवासी वस्ती करिता रस्ता काँक्रिटीकरण, पाण्याची उंच टाकी बांधणे, नाला व गटर बांधणे या कामांना देखील सरपंच संदीप उंबरे व उपसरपंच संजय ढाकोळ यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.

यावेळी एकता निराधार संस्थेचे अध्यक्ष सागर रेड्डी, ग्रामपंचायत सदस्य रामदास पांडवे, संजय उघडे, रवी वाघमारे, नमिता पिंगळे, पल्लवी शिवेकर, सारिका लांडगे, राणी भोरडे, संगिता पिंगळे, ग्रामसेवक डी.एस. शेंडगे यांच्यासह ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.