Pune Crime News : व्यापाऱ्याची पावणेतीन कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – सदनिका देण्याच्या नावाखाली एका व्यापाऱ्याची 2 कोटी 61 लाखांची फसवणूक (Pune Crime News) करण्याची घटना चाकणमध्ये उघडकीस आली आहे. याबाबत दत्तात्रय गायकवाड यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Pune Crime News :  चंदननगर परिसरात जुगार अड्ड्यांवर छापा, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चाकण येथील एकतनगरच्या स्वप्ननगरी गृह प्रकल्पातील 70 सदनिका फिर्यादीस देण्याचे ठरले. त्याप्रमाणे साई असोसिएट व फिर्यादी यांच्यात करार झाला. त्यामुळे फिर्यादीने दोन कोटी 61 लाख रुपये आगाऊ रक्कम दिली. मात्र आरोपींनी ठरलेले (Pune Crime News)  बांधकाम केले नाही व फिर्यादीस दोन कोटी 61 लाख रुपयांमध्ये त्यांना 25 हजार 700 स्वे फुटाचे देय पझेशन असलेल्या 35 सदनिका देण्याचे नवीन करारनाम्याप्रमाणे ठरले.

 

 

 

परंतु साई असोसिएटतर्फे 35  सदनिका न दिल्याने पुन्हा तडजोड होऊन मूळची 2 कोटी 61 लाख रुपये व नुकसान भरपाई म्हणून वाढीव 6 कोटी देण्याचे मान्य केले. त्यानुसार पंजाब नॅशनल बॅंकेच्या चाकण शाखेचे 12 पोस्ट डेटेड चेक दिले. त्यानंतर फिर्यादीने चेक जमा केले असता ते वठले नाहीत. या प्रकरणी संतोष धडगे, साई असोसिएटचे भागीदार गणेश झगडे, ऋषीकेश झगडे व रवींद्र झगडे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.