Chikhali News : दुबईतील व्यापाऱ्यांकडून चिंचवडच्या कांदा व्यापाऱ्याची फसवणूक

आयात केलेल्या कांद्याचे पैसे न देता 10 लाख 82 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज : दुबई येथील जबेल अल नजर फूड स्टफ ट्रेडिंग कंपनीच्या वतीने तीन व्यापाऱ्यांनी चिंचवड येथील एका व्यापाऱ्याकडून 29 टन कांदा मागवला. चिंचवड येथील व्यापाऱ्याने कांदा दुबईला पाठवला असता आरोपी व्यापाऱ्यांनी आयात केलेल्या कांद्याचे पैसे न देता चिंचवड येथील व्यापा-याची दहा लाख 82 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 15 फेब्रुवारी ते 17 एप्रिल या कालावधीत चिंचवड येथे घडला.

जबेल अल नजर फूड स्टफ ट्रेडिंग कंपनीचे मालक दुर्गाप्रसाद कुना (मूळ रा. आंध्रप्रदेश), कार्यकारी व्यवस्थापक आनंद देसाई (मूळ रा. औरंगाबाद), खरेदी समन्वयक अख्तर (रा. दुबई) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. याबाबत चेतन राजेंद्र मारणे (वय 28 रा. चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना मेल करून संपर्क केला. त्याद्वारे आरोपीने फिर्यादी यांना कांदा मालाची आयात करण्याची विचारणा केली. त्यानुसार फिर्यादी यांनी दुबई येथील जबेल अल नजर फूड स्टफ ट्रेडिंग कंपनीच्या नावे 29 टन कांदा निर्यात केला.

त्याची किंमत 14 हजार 935 डॉलर असून भारतीय चलन याप्रमाणे 10 लाख 82 हजार 40 रुपये एवढी आहे. निर्यात केलेल्या कांद्याचे पैसे फिर्यादी यांनी वारंवार मागून देखील आरोपींनी त्यांना पैसे न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.