Pimple Saudagar : पिंपळे सौदागर येथे पारंपारिक पद्धतीने रंगला महाभोंडला

एमपीसी  न्यूज – पिंपळे सौदागर येथील गणेशम फेज २ सोसायटी येथे रविवारच्या सूट्टीचे औचित्य साधत शारदीय उत्सवात आगळा वेगळ्या महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते. महाभोंडल्याचा आनंद महिलांनी लूटला. 

सोसायटीमधील सर्व वयोगटातील स्त्रियांनी उत्साहाने भोंडल्याची गाणी गात फेर धरला. नगरसेवक विठ्ठल नाना काटे व नगरसेविका शीतल नाना काटे यांच्या हस्ते महाआरती करून भोंडल्याच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रश्नमंजुषेसह विविध पारंपारिक खेळ झाले. या कार्यक्रमात सोसायटीमधील सर्व स्त्रियांनी उत्साहात सहभाग घेतला होता.

_MPC_DIR_MPU_II

पिंपळे सौदागरला आज आयटी हब म्हणून ओळखले जाते. येथील उच्चशिक्षित महिलांनी भोंडल्यासारख्या पारंपारिक खेळाचे आयोजन करून पिंपळे सौदागरकरांनी एक आपले वेगळेपण जपले आहे.

यावेळी नगरसेविका शीतल नाना काटे म्हणाल्या, भारतीय संस्कृतीची व सणाची नव्या पिढीला ओळख व्हावी, तसेच आपले पारंपारिक सण साजरे करत असताना खेळल्या जाणा-या पारंपारिक खेळांची माहिती व्हावी यासाठी गणेशम फेज २ या सोसायटीतील महिलांनी पुढाकार घेत महाभोंडला आयोजित केला. त्याबद्दल त्यांचे आभारही मानले. तसेच यापुढे असेच आपली भारतीय संस्कृती जतन करणारे, असे पारंपारिक कार्यक्रम व खेळ  इतर ठिकाणीही घ्यावे, असे सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.