Pune : दहिहंडी निमित्त आज संध्याकाळपासून पुण्यात वाहतूकीत बदल

एमपीसी न्यूज – दहीहंडी पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीमुळे पुणे (Pune) शहर परिसरात वाहतूक पोलिसांनी वाहतूकीत बदल केले आहेत. हे बदल सायंकाळी पाच पासून ते दहीहंडी महोत्सव संपेपर्यंत कायम राहणार आहेत.

Pune : रस्तापेठ अतिउच्चदाब उपकेंद्र दुरुस्तीसाठी राहणार बंद; मात्र वीजपुरवठ्यावर परिणाम नाही

शहराच्या मध्य भागातील शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता परिसरातील वाहतूक संध्याकाळी 5 ते दहीहंडी संपेपर्यंत वाहतूक वळवण्यात येणार आहे. वाहन चालकांनी या काळात पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केलं आहे.

पुण्यात दरवर्षी दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. पुण्यातील दहीहंडी उत्सव सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून लोक येतात. या काळात पुणेकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, हीच गोष्ट लक्षात घेऊन यंदा दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी शहर परिसरातील वाहतूकीत बदल केले आहे.

बुधवार चौकाकडून आप्पा बळवंत चौकाकडे होणारी वाहतुक एकेरी होणार आहे. याशिवाय मजूर अड्डा चौक (बुधवार चौक) ते दत्तमंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, मजूर अड्डा चौक ते अप्पा बळवंत चौक, महात्मा फुले मंडई अशा रस्त्यांनी प्रवास करणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्ग वापरावा, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.