Pune : शिंदे पुलावर अर्ध्या तासापासून वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज – गणपती माथा, शिंदे पूल, शिवणे, एनडीए रस्त्यावर रविवारी रात्री 8 पासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. वाहतूक कोंडी सुरळीत होत नसल्याने नागरिक आणि वाहनधारकांमध्ये वाद होत आहेत. दुचाकीधारक कुठूनही पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, वाहतूक कोंडीतून कोणाचीच सुटका होताना दिसून येत नाही. या रस्त्यावर रोज रात्री वाहतूक कोंडी होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.