Pimpri : वाकडेवाडी ते बोपोडी अंतरासाठी लागले अडीच तास ! वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक हैराण

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई महामार्गावर वाकडेवाडीपासून पुढे शॉपर्स स्टॉपपासून बोपोडी चौकापर्यंत पिंपरी व पुण्याकडे जाणा-या मार्गावर शुक्रवारी (दि. 19) सायंकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली. वाकडेवाडी ते बोपोडी चौकापर्यंत प्रवास करण्यासाठी अडीच तास आणि खडकी स्टेशनपासून पिंपरीपर्यंत येण्यासाठी तब्बल दोन ते अडीच तासांचा कालावधी लागल्यामुळे वाहनचालक हैराण झाले.

_MPC_DIR_MPU_II

शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासूनच वाहतूक कोंडी होत होती. येथील रेल्वे क्रॉसिंगवरून दारूगोळा कारखाना येथे जाणारी रेल्वे आडवी आल्यामुळे आणि त्याच वेळी रस्त्यात बस बंद पडल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली. त्यातच सायंकाळी मुसळधार पाऊस पडल्याने रस्त्यात पाणी साचले. या सर्वांमुळे ही वाहतूक कोंडी झाली. रात्री उशिरानंतर वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.