Talegaon Dabhade : सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रवेशद्वाराच्या निर्मितीमुळे तळेगाव दाभाडेच्या वैभवात पडणार भर

नागरिकांना सहकार्य करण्याचे सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठानचे आवाहन

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील लिंब फाटा येथील सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रवेशद्वाराच्या कमानीचे काम चालू आहे. या कामामुळे लिंब फाट्यावरून तळेगावकडे येणारी वाहतूक एका बाजूने अडविण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तरी नागरिकांनी गावातील मुख्य रस्त्यावरील या प्रवेशव्दाराचे काम चालू असल्याने पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्या पराक्रमाने तळेगाव दाभाडे शहराला इतिहास प्राप्त झाला आहे. त्याची स्मुर्ती म्हणून लिंब फाटा येथे त्यांचे नावाने प्रवेशव्दाराच्या कमानीचे काम चालू आहे. त्यामुळे तळेगावातील नागरिकांना प्रवेशव्दारावर वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

नागरिकांची ही आडचण लक्षात घेऊन चालू काम गतीने करण्याचा मानस संयोजकाचा आहे. त्यासाठी नागरिकांनी या लोकसहभागातील कमानीच्या कामाला सहकार्य करावे, असे आवाहन सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठानच्या झालेल्या बैठकीत करण्यात आले. असल्याची माहिती प्रतीष्ठानचे अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी दिली.

सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठानच्या तळेगाव स्टेशन येथील कार्यालयात  झालेल्या बैठकीत सदर आवाहन करण्यात आले. यावेळी संतोष दाभाडे पाटील, ॲड रवींद्र दाभाडे, अण्णासाहेब दाभाडे, हेमंत दाभाडे, बाबाजी दाभाडे, ॲड. विनय दाभाडे, सोमनाथ दाभाडे, महेश काळे, संपत दाभाडे, निलेश दाभाडे, मनोहर दाभाडे आदी संचालक उपस्थित होते.

तळेगाव दाभाडे या गावाला पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्या पराक्रमाचा इतिहास आहे. त्यास अनुसरून स्थानिक गावकऱ्यांनी एकत्र येऊन या प्रवेव्दाराच्या कामाला सुरुवात केली. या प्रवेशव्दारामुळे तळेगावच्या वैभवात भर पडणार असून भविष्यकाळात हे प्रवेशव्दार प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळखले जाणार आहे.मधल्या काळामध्ये काही अपरिहार्य कारणामुळे हे काम थांबलं होतं. परंतु सद्यस्थितीला हे काम पुन्हा सुरू झाले आहे.काम करण्यासाठी हा वर्दळीचा रस्ता निम्म्यावर आडवणे  गरजेचे आहे. त्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना व वाहनचालकांना याचा त्रास होत आहे. याची जाणीव संयोजकांना आहे. हे काम जास्तीत जास्त लवकर पूर्ण करण्याचा मानस संयोजकांचा आहे, असे मार्गदर्शक ॲड. रवींद्र दाभाडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.