Traffic on Highway: पुणे-नाशिक महामार्गावर दिवसभर कोंडी

एमपीसी न्यूज: पुणे-नाशिक महामार्गावर मागील दोन दिवसांपासून मोठी वाहतूक कोंडी होत आहे.चाकण पासून कुरुळी पर्यंतच्या भागात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. (traffic on Highway) महामार्गावर आणि सेवा रस्त्यावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. अनेक वाहन चालक मुख्य महामार्गावर कोंडीत अडकून पडावे लागू नये म्हणून सेवा रस्त्याने वाहने दामटत असल्याने सेवा रस्त्यावरील वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला होता.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाट्यापासून उत्तर पुणे जिल्ह्यातील अंतरापेक्षा प्रवासाला अधिक वेळ लागत असल्याची हतबलता गेल्या काही दिवसांपासून पुणे-नाशिक महामार्गावरील प्रवासी अनुभवत आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरून सामान्य प्रवासी, नोकरदार यांना सकाळी कार्यालयात पोहोचताना आणि सायंकाळी या महामार्गाने प्रवास करताना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

 Karjat Crime: कर्जत हल्ला प्रकरणात सहा आरोपी अटक, गुन्ह्यात वापरलेले चार चाकी वाहन जप्त

वाहतूक कोंडीत वरचेवर अडकून पडल्याने वाढलेला प्रवासाचा वेळ, नुकसान आणि त्यामुळे होणारा शारीरिक – मानसिक त्रास यामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील प्रवासी, वाहन चालक अक्षरशः घायकुतीला आले आहेत. (Traffic on Highway) महामार्गावरील वर्दळीच्या भागात वाहनधारकांच्या रांगा प्रचंड लांब पर्यंत पोहचत असल्यामुळे तासनतास वाहतुकीची कोंडी सुटत नसल्याची स्थिती निर्माण होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.