Borghat news: रात्री झालेल्या अपघातामुळे आज पहाटे 2 तास मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक वळवली

एमपीसी न्यूज : बोरघाटात मध्यरात्री झालेल्या अपघातामुळे आज पहाटे 2 तास मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक वळवण्यात आली होती, अशी माहिती अनिल शिंदे, पोलीस उपनिरिक्षक, महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट यांनी दिली आहे.
अपघाताची माहिती देताना शिंदे म्हणाले की ट्रक क्र. MH-46- BM-0077 चालक दिपक काशिनाथ वतने (वय 39 मुळ रा. मालेगाव निलंगे जि. लातूर, सध्या रा. भिवंडी ठाणे) हे सोबत क्लीनर महादेव सुर्यभान नरवणे,  (वय 20 वर्ष) असे त्यांच्या ताब्यातील ट्रक मध्ये केमीकल भरलेले ड्रम घेऊन भिवंडी ते हैद्राबाद असा एक्सप्रेस वे वरून पुणे बाजूकडे दुस-या लेनने काल गुरुवारी रात्री जात होते. या ठिकाणी म्हणजेच मॅजिक पॉईंट जवळ आले ते पोहचले असताना त्यांचे ट्रकचे मागील भागात ट्रकने अचानक पेट घेतल्याचे ड्रायव्हर यांच्या लक्षात येताच ट्रक थांबवून क्लीनरसह खाली उतरले होते.
महामार्ग पोलिसांना याबाबत या अपघाताबाबत पुण्याकडे जाणाऱ्या वाहन चालकाने काल रात्री 11.55 वा कळवले. त्यामुळे शिंदे व त्यांच्या समवेत असलेले 12 पोलीस कर्मचारी घटनास्थळी 12.05 वा लगेच पोहोचले. त्यांनी वरिष्ठांना खोपोली पोलीस ठाण्याला व इतरांना या अपघाताबाबत कळविले.

पोलिसांनी याठिकाणी एक्सप्रेस वे वरून मुंबई व पुण्याकडून येणारी वाहतूक जुन्या पुणे मुंबई हायवेवर वळवली.
खोपोली नगर परिषदेचा, टाटा स्टील चा, रासायणी पाताळगंगा यांचा प्रत्येकी एक अग्निशमन बंब व देवदूत संस्थेचे 2 मिनी अग्निशमन बंब, असे एकूण पाच प्रश्न स्थळी आग विझवण्यासाठी आले होते. त्यांनी आग आटोक्यात आणल्यानंतर पहाटे 1.30 वा मुंबईला जाणाऱ्या लेन्स मधील ट्रॅफिक सुरू करण्यात आली.
ट्रक मधील केमिकल जळाल्यामुळे रस्ता चिकट झाला होता. त्यामुळे वाहनांचा अपघात होण्याची शक्यता होती.
पुणे दिशेने जाणाऱ्या तीनही लेन्स अग्निशमन बंबाच्या सहाय्याने धुऊन घेण्यात आले. त्यानंतर पहाटे 2.15 वा ह्या तिन्ही लेन्स पुणे कडे जाणाऱ्या वाहनांसाठी खुले करण्यात आले. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही कोणीही जखमी झालेले नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.