Pune News : पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना वाहतूक पोलीस जाळ्यात; दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात कारवाई

एमपीसी न्यूज : गणेश चतुर्थीला शिवाजी रोडवर (Pune News) श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात वाहतूक नियमन न करता दुचाकी अडवून तरुणांना दहा हजारांचा दंड भरण्यास सांगत त्यांचाकडून 500 रुपयांची मागणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे पोलीस खात्यातून निलंबन करण्यात आले आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी हे आदेश दिले आहेत. 

 

दरम्यान, गणेश चतुर्थीला दर्शनासाठी लाखो भाविक येतात. अशा वेळी वाहतूक नियमन करण्याऐवजी वाहन चालकांना थांबवून त्यांना दंड भरण्यास सांगितले. पोलीस नाईक अनिल कल्लाप्पा जामगे असे निलंबित केलेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. जामगे हे फरासखाना वाहतूक शाखेत कर्तव्यास आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी (11 मार्च) जामगे यांची शिवाजी रोडवरील बुधवार चौकात नेमणूक होती.

Pune News : पुणे आणि मुंबईहून दक्षिण भारतात जाणाऱ्या रेल्वेला दौंडमध्ये थांबा द्या – सुप्रिया सुळे

 

दोघे दुचाकीवर बुधवार चौकातील सिग्नलला थांबले होते. (Pune News) त्यावेळी जामगे यांनी त्यांना लायसन्सची विचारणा केली. लायसन्स नसल्याने विना लायसन्स वाहन चालविण्याकरीता 5 हजार रुपये दंड तसेच गाडीचे मालक दुसरे असल्याने चालक व मालक असे 10 हजार रुपये दंड भरा असे सांगितले. पैसे नसल्याने त्यांनी विनंती केली. त्यावेळी तक्रारदारांना 500 रुपये रोख आणण्यास सांगितले.

 

तक्रारदार हे एटीएममध्ये पैसे आणण्यास गेले. पण, त्यांच्याकडे एटीएम नसल्याने ते परत आले. त्यानंतर जामगे यांनी तक्रारदार यांची गाडी वाहतूक विभागात आणली. स्वत:ची नेमप्लेट पाडून आपली ओळख लपविली. तत्पुर्वी वरिष्ठांना व पोलीस अंमलदारांना कारवाई दरम्यान बॉडी कॅमेरे वापरण्याबाबत आदेश दिले होते. परंतु त्याने बॉडी कॅमेरा बाळगला नाही व दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही.

 

संकष्टी चतुर्थी असल्याने शिवाजी रोडवर मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होती व त्यामुळे दगडुशेठ मंदिर व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती.(Pune News) अशा वेळी तक्रारदार यांची गाडी अडवून त्यांच्याशी चर्चा करण्यामध्ये विनाकारण वेळ वाया घालविला व नेमून दिलेल्या वाहतूक नियमानाचे कर्तव्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे बेशिस्त बेजबाबदार वर्तन केल्याने अनिल जामगे यांना निलंबन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.