Pimpri News : रस्ते, पदपथांवरील अतिक्रमणांवर वाहतूक पोलीस, महापालिका करणार एकत्रित कारवाई

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर आणि पदपथांवर करणाऱ्यात आलेल्या अतिक्रमणांवर शहर वाहतूक पोलीस आणि महापालिका हे एकत्र मिळून कारवाई करणार आहेत. त्यासाठी वाहतूक पोलीस आणि महापालिका यांनी विशेष पथके नेमली आहेत.  या पथकांद्वारे अतिक्रमणांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

शहरातील अनेक रस्त्यांवर तसेच पदपथांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले दिसून येत आहे. अनेक व्यावसायीकांनी खाद्यपदार्थांचे गाडे, चहाच्या टपऱ्या, पानटपऱ्या, कपड्यांची छोटी दुकाने पदपथांवर थाटली आहेत. तसेच काही जणांनी तर थेट पदपथांवर पत्र्याचे शेडच उभे केले आहे. यामुळे नागरिकांना चालताना तसेच वाहतुकीलाही मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. याबाबत वारंवार नागरिक तक्रार करत आहे.

या अतिक्रमणांना हटविण्यासाठी वाहतूक पोलीस आणि महापालिका सरसावली आहे. त्यासाठी संयुक्त पथक तयार करून कारवाईचे नियोजन केले आहे. पदपथांवरील हातगाड्या, पथारीवाले, रस्त्यांवरील टपऱ्या, बेवारस वाहने यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.