Pune News : तंबाखूजन्य पदार्थांचा अवैधरित्या साठा करुन विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला अटक 

एमपीसी न्यूज – गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा अवैद्यरित्या साठा करुन विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी (दि.6) कोंढवा परिसरात ही कारवाई केली. 

भवरलाल पेमारामजी भाटी (वय 28, रा. अजमेरा पार्क, कोंढवा खुर्द, पुणे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यापा-याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी याने गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यासाठी ट्रक मागवला होता. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने याठिकाणी छापा टाकून 15 लाख 72 हजार किंमतीचे तंबाखूजन्य पदार्थ व टेम्पो जप्त करण्यात आला आहे. अटक आरोपी भाटी याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हि कारवाई पोलीस उपआयुक्त बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे व पोलीस अंमलदार प्रदीप टिळेकर, रमेश चौधर, मयूर सूर्यवंशी यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.