Tragedy king And He-Man: धर्मेंद्र यांनी जागवल्या दिलीपकुमार यांच्या सोबतच्या 22 वर्षांपूर्वीच्या आठवणी

Tragedy king And He-Man : Dharmendra awakens memories of 22 years ago with Dilip Kumar धर्मेंद्र या ट्विटमध्ये म्हणत आहेत की, 'दिलीपसाब भले पंजाबी, हिंदी, उर्दू किंवा अगदी इंग्रजीतून बोलले तरी त्यांचे भावनाशील बोलणे अगदी मनात भिनते

एमपीसी न्यूज – ‘ही मॅन’ धर्मेंद्र आणि ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीपकुमार यांनी एकमेकांसोबत ‘अनोखा मिलन’ या एकाच चित्रपटात काम केले. पण दोघांना जोडणारा एक दुवा आहे तो म्हणजे पंजाबी बाणा. नुकतीच धर्मेंद्र यांनी २२ वर्षांपूर्वीची एक क्लिप शेअर केली. त्यात दिलीपकुमार पंजाबीतून भाषण देताना दिसत आहेत. त्यात दिलीपकुमार यांनी त्यांच्या या वयातील तंदुरुस्तीचे रहस्य सांगितले आहे. तसेच त्यांची राहणी आणि भाषा यांच्यातील साम्य पण सांगितले आहे.

धर्मेंद्र या ट्विटमध्ये म्हणत आहेत की, ‘दिलीपसाब भले पंजाबी, हिंदी, उर्दू किंवा अगदी इंग्रजीतून बोलले तरी त्यांचे भावनाशील बोलणे अगदी मनात भिनते’. हा व्हिडिओ 1998 सालचा असून त्यावेळी दिलीपकुमार साधारणपणे 75 वर्षांचे आहेत. दिलीपकुमार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डिसेंबर 2019 मध्ये धर्मेंद्र यांनी एक पोस्ट शेअर केली होती.

त्यात त्यांनी आपल्या भावना मांडल्या होत्या. ‘अनोखा मिलन…अगदी थोड्या क्षणांचा मिलाप…नंतर जीवनभर कोणत्याही दुस-या फिल्ममध्ये काम करण्याची संधी मिळालीच नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलीपसाब…प्रेम आणि आदर’, असे धर्मेंद्र यांनी पोस्टमध्ये म्हटले होते.

दिलीपकुमार हिंदी फिल्मइंडस्ट्रीचे ट्रॅजेडीकिंग म्हणून ओळखले जातात. सध्या त्यांचे वय 97 वर्षांचे असून त्यांच्या पत्नी सायराबानू त्यांची जीवापाड काळजी घेतात.

ही मॅन हे बिरुद मिरवणारे धर्मेंद्र सध्या 83 वर्षांचे असून त्यांचा बराचसा वेळ लोणावळा येथील त्यांच्या फार्महाऊसवरच घालवतात. त्यांची तिसरी पिढी म्हणजे सनी देओल याचा मुलगा आता चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.