Kamshet : कामशेत बोगद्याजवळ ट्रेलर आणि कारचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू एकजण गंभीर

एमपीसी न्यूज – कामशेत बोगद्याजवळ ट्रेलर आणि कारचा विचित्र अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज (मंगळवारी) दुपारी सव्वातीनच्या सुमारास झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असलेल्या एका ट्रेलरला भरधाव वेगात आलेली कार (एम एच 14 / जी एच 8239) जोरात धडकली. हा अपघात कामशेत बोगद्याजवळ पुण्याच्या बाजूला दोन किलोमीटर अंतरावर पुणे लेनवर झाला. कारमधून तीनजण प्रवास करत होते. या अपघातात तिघांमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. त्याला तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेला प्रवासी बोलू शकत नसल्याने पोलिसांना कारमधील प्रवाशांची नावे मिळू शकलेली नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.