Lonavala News : शिलाटणे फाटयावर ट्रेलर व दुचाकी अपघात; लहान बाळासह महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज –  मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाच्या हद्दीत आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका भरधाव ट्रेलरची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात लहान बाळासह महिलेचा मृत्यू झाला.  यात  दुचाकी चालवणारी व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.

MH 14 JZ 1984 क्रमांकाची ही दुचाकी आहे.  अतिशय भयंकर असा हा अपघात आहे. अपघाताची माहिती समजताच स्थानिक नागरिक व लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी व्यक्तीला उपचारासाठी दाखल केले असून अपघातग्रस्त वाहने बाजुला केली आहेत.

अपघातातील जखमी हे मुळचे राजस्थानमधले असून ते सध्या पुण्यात राहतात. ते लोणावळ्यावरून पुण्चायाकडे चालले होते त्यावेळी कंटेनरची धडक बसल्याने कंटेनरखाली महिला आणि  लहान मूल आले. मात्र सुदैवाने  गाडी चालवणारी व्यक्ती वाचली.

गाडी चालवीण्याऱ्या माणसाचा पाय मोडला असून त्याला उपचारासाठी बडे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.