Pune : ‘हायड्रोजन जनरेटर’वर ‘रायसोनी’मध्ये प्रशिक्षण

एमपीसी न्यूज – वाघोली येथील जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात मुंबईतील लायन्स क्लब ऑफ अ‍ॅक्शनच्या सहकार्याने ‘हायड्रोजन जनरेटर’वर एका महिन्याचे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले.

विविध शाखांतील 50 विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी यामध्ये सहभाग घेतला. इंधन अभ्यासक सुनील जोगदंड, लायन्स क्लब ऑफ अ‍ॅक्शनचे अध्यक्ष जी. बी. लुथ्रिया आणि जिगर चावडा यांनी प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन केले.

पर्यायी इंधन म्हणून हायड्रोजन वायूला विकसित करण्याचे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले. काही प्रात्यक्षिकेही करुन दाखविण्यात आली. हायड्रोजन जनरेटर कीट तयार करुन त्याची चाचणीही करण्यात आली. सहभागी विद्यार्थी-प्राध्यापकांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच हायड्रोजन वायूवर संशोधन करु इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन लायन्स क्लबच्या वतीने देण्यात आले. प्राचार्य डॉ. आर. डी खराडकर, डॉ. वंदना दुरेजा, स्नेहा पोखरकर यांच्यासह इतरांनी पुढाकार घेत हे प्रशिक्षण शिबिर घडवून आणले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.