Vadgaon Maval : उद्योग, व्यवसायात यश मिळविण्यासाठी प्रशिक्षण महत्वाचे – संतोष जांभुळकर

एमपीसी न्यूज – उच्च शिक्षित महिलांनी उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण घ्यावे. आपला उद्योग, व्यवसाय यशस्वी करण्यासाठी त्या व्यवसायाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, असे मत माजी आदर्श सरपंच संतोष जांभुळकर यांनी व्यक्त केले.

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली संतोषभाऊ जांभुळकर युवा मंचाच्या वतीने महिला सबलीकरण व सक्षमीकरणाच्या उद्देशाने तसेच कामशेत व कान्हे येथील महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने पुन्हा नायगाव येथील मारुती मंदिर परिसरात सोमवारी (दि.10) हॅन्ड एमब्रॉडरी, केक व कागदी- कापडी पिशवी बनविणे आदींचे मोफत प्रशिक्षणाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

ग्रामपंचायत सदस्य रोहिणी अंकुश चोपडे, बाबाजी चोपडे, सुजाता सुनील चोपडे, सुनीता प्रकाश चोपडे, आरिफ चांद मुलाणी, संदीप ओव्हाळ, माधुरी ओव्हाळ, मंगल चोपडे, सोनल योगेश शिंदेसह बहुसंख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

उच्च शिक्षित महिलांनी उद्योग-व्यवसायाचे प्रशिक्षण घेतल्यावरच उद्योग व्यवसायात प्रगती करु शकतात. महिलांनी आत्मविश्वासाने, सातत्याने व चिकाटीने व्यवसाय केल्यावरच महिला उद्योग विश्वात आपला ठसा उमटवतील, असे जांभुळकर म्हणाले.

ओम ग्रामण्ये इन्स्टीट्युट फॉर एज्युकेशन एक्सलन्स यांचे तज्ञ प्रशिक्षक प्रशिक्षण देत आहे. हे सहा दिवसाचे प्रशिक्षण असुन नायगाव व येवलेवाडी येथील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भानुदास जांभुळकर यांनी केले. आभार सोनल शिंदे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.