Vadgaon : कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सगुना राईस तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यातील बधलवाडी येथे कृषी विभागामार्फत नवलाखउंब्रे येथील शेतकऱ्यांना सगुना राईस तंत्रज्ञानाबद्दल प्रशिक्षण देण्यात आले.

यामध्ये गादीवाफे कसे तयार करायचे याचे प्रात्यक्षिक चंद्रकांत बधाले यांच्या शेतात करून दाखविण्यात आले. व खरीप हंगाम जवळ येत असल्याने भात लागवडीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कोरोनाच्या पाश्वभूमीवर परप्रांतीय मजूर आपापल्या निघून गेले आहेत. तर स्थानिक मजूर उद्योग व्यवसायात गुंतल्यामुळे मजुरीचे भाव वाढण्याची शक्यता आहे.

आगामी काळात मजूर टंचाई निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरुन सगुना राईस तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सोशल डिस्टन्सिंग राखत सहाय्यक कृषी अधिकारी नवीनचंद्र बोऱ्हाडे यांनी या तंत्रज्ञानाबद्दल सखोल मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी पी. एस. पाटील यांनी सगुना राईस तंत्रज्ञानाचे महत्व पटवून दिले.

तालुका कृषी अधिकारी देंवेद्र ढगे, मंडळ कृषी अधिकारी व्ही. व्ही. कुलकर्णी, कृषी पर्यवेक्षक डी. डी. तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण घेण्यात आले.

या प्रसंगी कृषीमित्र अनिल बधाले, दशरथ बधाले, शेखर जाधव व नवलाख उंबरे, जाधववाडी, मिंडेवाडी भागातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.