सोमवार, सप्टेंबर 26, 2022

YCMH News : ‘हवेचे प्रदुषण अन् त्याचे आरोग्यावर होणा-या दुष्परिणा’बाबत प्रशिक्षण; 150 आशा स्वयंसेविकांचा सहभाग

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालय/दवाखाना अंतर्गत कार्यरत सर्व आशा स्वयंसेविका यांचे “हवेचे प्रदुषण आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम” यावर प्रयास आरोग्य गट यांचे मार्फत वरिष्ठ संशोधन सहकारी डॉ.रितु यांनी प्रशिक्षण दिले.यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात मंगळवारी झालेल्या प्रशिक्षणाकरीता 150 पेक्षा जास्त आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ.पवन साळवे, जेष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ.वर्षा डांगे, वैद्यकिय अधिकारी कल्पना गडलिंकर, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.चैताली इंगळे उपस्थित होते.वातावरणातील बदलाचा परिणाम मानवी आरोग्यावर तसेच विविध आजारांच्या प्रमाणावर होतो. हे आता सर्वमान्य झाले आहे. या विषयाच महत्व लक्षात घेउन 2020-21 पासून राष्ट्रीय वातावरणातील बदल आणि मानवी आरोग्य कार्यक्रम (National Programme for Climate Change and Human Health) अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये अंतर्भुत करण्यात आला आहे.

त्याअनुषंगाने वातावरणातील बदलाला संवेदनशील असणा-या आजारांना समर्थपणे तोंड देता यावे यासाठी सर्व नागरिकांसाठी आणि विशेषत:लहान मुले, स्त्रिया, वयोवृध्द, आदिवासी आणि परिघावरील जनसमूहांसाठी आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करणे आवश्यक असुन या विषयाशी निगडीत सर्व संबंधितांमध्ये जागृती करणे, आरोग्य संस्था वातावरणातील बदलासाठी अधिक सक्षम करणे, यासाठी आवश्यक ती तयारी आणि मनुष्यबळ प्रशिक्षित करणे आवश्यक आहे.

Charohali News : पीएमपीएमएलच्या चार्जिंगसाठी उभारणार ईव्ही चार्जिंग; 7 कोटींचा खर्च

तसेच शहरांतर्गत वाढते हवा- प्रदुषण हा सार्वजनिक आरोग्याचा एक महत्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचा वाढता आवाका पाहता त्यावर त्वरेने उपाय योजना करणे आवश्यक आहे.त्याचाच एक भाग म्हणजे या विषयाबद्दल योग्य माहिती लोकांपर्यंत योजना पोहोचविणे आवश्यक आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी महत्वाची भूमिका बजावु शकतात. त्याकरीता आरोग्य कर्मचारी यांना या विषयाबद्दलची अचूक आणि अद्ययावत माहिती असणे आवश्यक आहे.

spot_img
Latest news
Related news