Pimpri : सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांची बदली रद्द

एमपीसी न्यूज – राज्य पोलीस दलातील उपअधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या (Pimpri)अधिकाऱ्यांच्या सोमवारी (दि. 22) बदल्या करण्यात आल्या. त्या बदल्यांमध्ये बुधवारी (दि. 24) अंशत: बदल करण्यात आले. त्यात पिंपरी-चिंचवडच्या सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांची बदली रद्द झाली आहे.
राज्य शासनाचे अवर सचिव स्वप्निल बोरसे यांनी याबाबत आदेश दिले आहेत. राज्याच्या गृह विभागातर्फे सोमवारी पोलीस उपअधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात पिंपरी -चिंचवड शहरातील तीन सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या झाल्या.
यामध्ये गुन्हे शाखेचे प्रशांत श्रीराम अमृतकर यांची पोलीस (Pimpri) उपअधीक्षक गडचिरोली येथे बदली झाली. तर वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत औदुंबर डिसले यांची पोलीस उपअधीक्षक नंदुरबार येथे बदली झाली. तसेच चाकण विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा जीवन कट्टे यांची पोलीस उपअधीक्षक चिमूर, जि. चंद्रपूर येथे बदली करण्यात आली होती.
मात्र, बुधवारी काढलेल्या आदेशामध्ये कट्टे यांची बदली रद्द करण्यात आली आहे. त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.