PMRDA News : पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांची बदली; राहुल महिवाल नवे आयुक्त

एमपीसी न्यूज – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चे आयुक्त सुहास दिवसे यांची राज्य शासनाने गुरुवारी बदली केली आहे.त्यांच्या जागी राज्याच्या महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त राहुल महिवाल यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, नव्या सरकारने पुणे जिल्ह्यातील प्रशासकीय साफसफाई सुरू केली असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे विश्वासू अधिकाऱ्यांना चुनचूनके बाहेर काढले जात आहे.

महाविकास आघाडी सरकारने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे विलीनीकरण पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात ‘पीएमआरडीए’ मध्ये करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पीएमआरडीएचे महत्व वाढले होते.पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकासात पीएमआरडीएचे महत्व आहे.तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पीएमआरडीएच्या आयुक्तपदी सुहास दिवसे यांची नियुक्ती केली होती.राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे विश्वासू अशी दिवसे यांची ओळख होती.

राज्यात सत्ता बदल होताच पुणे जिल्ह्यातील प्रशासकीय साफसफाई सुरू झाली आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे जिल्ह्यातील विश्वासू अधिकाऱ्यांना चुनचूनके बाहेर काढले जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यानंतर आता पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांची बदली केली आहे. त्यांच्याजागी राज्याच्या महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त राहुल महिवाल यांची नियुक्ती केली आहे. दिवसे यांना वेटिंगवर ठेवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.