Wakad : पावणेदोन लाखांचे ट्रान्सफॉर्मर चोरीला

एमपीसी न्यूज – ‘महावितरण’चे 1 लाख 80  हजार रुपयांचे ट्रान्सफॉर्मर चोरट्यांनी चोरून नेले. 4 नोव्हेंबर आणि 22 नोव्हेंबरला रोजी वाकड येथे ही चोरी झाली.

सनी पोपट टोपे (वय 30, रा. टियारा सोसायटी, हॉटेल सयाजीच्या मागे, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी टोपे हे ‘महावितरण’मध्ये सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे सांगवी, वाकड, ताथवडे या परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करणे, वीज संच मांडणीची देखभाल व दुरूस्ती करणे, तसेच ट्रान्सफार्मरची देखभाल व दुरूस्ती करणे आदी वीज संबंधीच्या कामाची जबाबदारी आहे. ‘महावितरण’चे वाकडच्या मोटार गॅरेज आणि लॉजजवळ ट्रान्सफार्मर ठेवण्यात आले होते. त्यातील 1 लाख 80  हजार रुपयांचे ट्रान्सफार्मर चोरट्यांनी चोरून नेले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.