Chikhali News: परिवहन कार्यालय सुरु करणार, परिवहन मंत्री अनिल परब यांचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रश्नाला उत्तर

एमपीसी न्यूज – चिखली येथील गट क्रमांक 539 मधील पेठ क्रमांक 13 येथील चार हेक्टर शासकीय जागेवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रश्नाला त्यांनी लेखी उत्तर दिले.

चिखली येथील गट क्रमांक 529 मधील पेठ क्रमांक 13 येथील चार हेक्टर जागेचा ताबा 24 ऑगस्ट 21 रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवड यांना मिळाला. या शासकीय जागेवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवड या कार्यालयासाठी तातडीने वाहन तपासणी केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही सुरु करण्याचे परब यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलेल्या कपात सुचनेला उत्तर देताना लेखी स्वरुपात दिले.

सन 2021 च्या प्रथम अधिवेशनात मांडण्यात आलेली अर्थसंकल्पीय कपातसूचना क्रमांक 2683 उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येनुसार वाहनांची मागणी वाढत असल्याने पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची जागा अपुरी पडणे. वाहन तपासणी केंद्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सुरू करण्यात येणे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेली चिखली येथील सदर चार हेक्टर शासकीय जागा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे हस्तांतरित करण्याबाबतचा सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे मंजुरी करता पाठवण्यात येणे. चिखली येथील गट क्रमांक 539 मधील पेठ क्रमांक 13 येथील चार हेक्टर शासकीय जागा तातडीने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवड यांच्याकडे हस्तांतरित करण्याबाबत शासनाने करावयाची तातडीची उपाययोजना व कार्यवाही, अशी मागणी जगताप यांनी केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.