Pune : पुण्यात 5 दिवसांपासून कचराकोंडी

उरुळी - देवाची ग्रामस्थांचा कचरा टाकण्यास विरोध

एमपीसी न्यूज – पुणे शहरात मागील 5 दिवसांपासून कचराकोंडी निर्माण झाली आहे. उरुळी – देवाची ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास विरोध केला आहे. त्यामुळे पुणे शहरात कचऱ्याचे जागोजागी ढीग निर्माण झाले आहे.

शहरातील इतर भागांतही कचरा जिरविण्यात येत आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. पण, ग्रामस्थ आंदोलनावर ठाम आहे. या कचराकोंडीवर पालकमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे तोडगा काढणार का, याकडे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.