Kothrud : ट्रॅव्हल एजंटकडून एमआयटीच्या विद्यार्थ्यांची 17 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – कोथरूड एमआयटीमध्ये शिकणाऱ्या 36 विद्यार्थ्यांची इंग्लडच्या तिकिटाची फी घेऊन 17 लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना जानेवारी 2018 ते ऑगस्ट 2018 यादरम्यान ट्रॅव्हल हाऊस पुणे, शिवाजीनगर येथे घडली. 

पुष्कराज यशवंत बाटे (वय 33) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्कराज बाटे याचे ट्रॅव्हल हाऊस ऑफिस असून त्याने कोथरूड येथील एमआयटी कॉलेजमधील फिर्यादी व त्याच्या इतर 35 जणांच्या टीमला इंग्लंडला जाण्यासाठी लागणारे तिकीट व त्यासाठी लागणाऱ्या इतर गोष्टींसाठी त्याच्या अकाऊंट वर तब्बल 17 लाख 22 हजार 310
रुपये व 500 युरो एवढी फी घेऊन या पूर्ण टीमला कोणतेही तिकीट न देता फसवणूक केली व त्याचे शिवाजीनगर येथील ऑफीस बंद करून निघून गेला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.