Bhosari : ट्रॅव्हलर-दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 5) पहाटे सव्वाबाराच्या सुमारास अनुकूल चौक, गवळी माथा, भोसरी येथे घडला.

एनायतुल्ला मोहंमद फारुक अंसारी (वय 23, रा.बाणेर) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एम एच 12 / आर एन 7069 या टेम्पो ट्रॅव्हलरवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चुलत भाऊ आझाद इसहाक अंसारी व त्यांचा साथीदार अक्षय गुडेवार हे गुरुवारी रात्री दुचाकीवरून घरी परतत होते. गवळी माथा, भोसरी येथील अनुकूल चौकात ते आले असता त्यांच्या दुचाकीला टेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिली. या भीषण अपघातात आझाद यांचा मृत्यू झाला. तर अक्षय हा गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर टेम्पो ट्रॅव्हलरचा चालक फरार झाला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.