Maval : जेएसपीएम कॉलेज, संस्कार प्रतिष्ठान, टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण

एमपीसी  न्यूज – जेएसपीएम कॉलेज, संस्कार प्रतिष्ठान, टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ येथे वृक्षारोपण करण्यात आले. 

मावळ येथील पाचर्णे ता. मावळ येथे 2500 वृक्षारोपण करण्याचा संकल्प करण्यात आला होता. तसेच विद्यार्थ्यांच्या व प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने उपक्रम पूर्ण करण्यात आला. यावेळी उपस्थित वनाधिकारी सुधीर भुजबळ, जेएसपीएम कॉलेजचे प्रा. डॉ. अमेय चौधरी,  प्रा.  प्रमिला  पारीख,  प्रा.दीपाली सुराणा, प्रथमेश आंबेरकर, कु. अनिकेत सोनवणे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.