Nigdi : दिवंगत महापौर मधुकर पवळे यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण 

एमपीसी न्यूज – मधुकरराव पवळे प्रतिष्ठानतर्फे  दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे यांच्या जयंतीनिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. 

महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते आज (गुरुवारी) निगडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, नगरसेविका सुमन पवळे, नगरसेवक उत्तम केंडळे, सचिन चिखले, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, जितेंद्र पवार संतोष  कवडे, शेखर चव्हाण, मारुती चौगुले, रोहित खर्गे, विठ्ठल झोडगे,  गुलाबराव सोनवणे, रघुनाथ कदम, ज्ञानेश्वर चिखले, रेश्मा साळवी, जयप्रकाश गावडे, संदीप कवडे,  प्रदीप पडवळ, कालिदास केंदळे उपस्थितीत होते.

तत्पूर्वी, महापौर राहुल जाधव स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या हस्ते दिवंगत महापौर मधुकर पवळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.