Vadgaon Maval News : वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज – तुकाराम असवले 

एमपीसीन्यूज – वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज आहे.असे प्रतिपादन श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी सरपंच तुकाराम असवले यांनी केले. 

मावळ  प्रबोधिनी व भक्ती शक्ती युवा मंचाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व मावळ तालुका भाजपाचे अध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या टाकवे बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॅलेज येथे वृक्ष वाटप व शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, सरपंच भुषण असवले, उपसरपंच सतू दगडे, भाजपचे सरचिटणीस सुनील चव्हाण, तळेगाव दाभाडे पत्रकार संघाचे मनोहर दाभाडे, मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष बी एम भसे, माजी  सरपंच  प्रल्हाद जांभूळकर, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ असवले, सुवर्णा असवले,संध्या असवले, ऋषीनाथ शिंदे,परशूराम मालपोटे,ज्योती आंबेकर, प्रतिक्षा जाधव, नारायण जाधव, प्रशांत शिंदे, लक्ष्मण शेलार उपस्थित होते.

असवले पुढे बोलताना म्हणाले की, रविंद्र भेगडे यांच्या परिवाराने राजकारणापेक्षा विकासासाठी समाजकारणाचा मार्ग अवलंबला आहे. वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण लागवड करून समाजात वेगळाच आदर्श निर्माण केला असल्याचे सांगून या स्तुत्य उपक्रमाचे तोंडभरून कौतुकही असवले यांनी यावेळी केले.

संत तुकाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले यांचे अध्यक्षतेखाली व भाजपाचे तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे आणि सरपंच भूपण असवले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच गरजू विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संचालक सोनबा गोपाळे गुरूजी, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजेश गायकवाड, मावळ प्रबोधिनीचे अध्यक्ष रविंद्र शेटे, देवा गायकवाड, सोमनाथ असवले, ज्योती आंबेकर आदींनी मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब उभे यांनी केले. नारायण असवले यांनी सुत्रसंचालन केले. सोपान असवले यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.