NavlaK Umbre: ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – नवलाख उंब्रे येथील पॉस्को इंडिया पुणे प्रोसेसिंग सेंटर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि ग्रामपंचायत नवलाख उंब्रे यांच्या संयुक्त विद्यमाने जगातिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून श्री राम मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

 

 

MPC News Event : भारताच्या उज्ज्वल ऐतिहासिक वारशांची नवीन पिढीला ओळख होणे गरजेचे – नितीन चंद्रकांत देसाई

 

पॉस्को आयपीपीसीचे डायरेक्टर एस. एच. किम, सरपंच सविता बधाले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या पर्यावरणपूरक उपक्रमात विविध जातीच्या शेकडो वृक्षाचे रोपण करण्यात आले.  झाडांमध्ये उचित अंतर ठेऊन, खड्डे घेऊन, लाल मातीचा वापर करून तसेंच संवरक्षक पिंजरा लावण्यात आला. याप्रसंगी कंपनीचे स्टाफ मॅनेजमेंट पदाधिकारी व ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.