Pune news: वृक्ष लागवडीने साकारेल हरित पुणे : महापौर मोहोळ

Tree planting will make green Pune: Mayor Mohol

एमपीसी न्यूज- उद्यान, वृक्ष प्राधिकरण पुणे महानगरपालिकेमार्फत आजपासून ‘वन महोत्सव’ साजरा करण्यात येत असून “वन महोत्सव” कार्यक्रमाद्वारे नागरिकांना जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी, हे उद्दीष्ट समोर ठेवून वन महोत्सव/साजरा केला जात आहे. पुण्यातील उद्यान कार्यालय जंगली महाराज रोड , या ठिकाणी अल्प दरात वृक्ष रोपे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या कार्यक्रमाचा शुभारंभ छत्रपती संभाजीराजे उद्यान पुणे या ठिकाणी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला.

या वन महोत्सव अंतर्गत नागरिकांना अल्पदरात चिंच, कांचन ,पळस, मोहर, बदाम, नेवार, जांभूळ, देवदार, करमळ, करंज ,रोहितक इत्यादी वृक्ष छत्रपती संभाजीराजे उद्यान जंगली महाराज रोड , पुणे येथे अल्पदरात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

हा वन महोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली असून सदरचा वन महोत्सव दिनांक १४/०८/२०२१ पर्यंत साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांना अल्प दरात वृक्ष रोपे उपलब्ध करण्यात येणार आहेत.

यावेळी बोलताना महापौर मोहोळ पुढे म्हणाले, ‘ हरित पुण्यासाठी शहरात जास्तीत जास्त वृक्ष लागवड होणे गरजेचे आहे पावसाळा हा वृक्ष लागवडीसाठी पोषक काळ असून वृक्ष लागवडीसाठी पुणेकर पुढाकार घेतील असा विश्वास त्यानी यावेळी व्यक्त केला.

सदर कार्यक्रमाचे संचालन माननीय अशोक घोरपडे (मुख्य उद्यान अधीक्षक) तथा सदस्य सचिव यांनी केले. या कार्यक्रमास वृक्ष प्राधिकरण समिती मा.सभास, सौ दिपाली धुमाळ,  सौ. सुजाता शेट्टी,  सौ.कालींदा पुंडे , श्री आदित्य माळवे, श्री संदीप काळे, श्री सचिन पवार ,सौ शिल्पा भोसले, श्री मनोज पाचपुते ,श्री. द.स. पोळेकर तसेच उद्यान व वृक्ष प्राधिकरण कार्यालयाकडील, उद्यान अधीक्षक, सहायक उद्यान अधीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायझर , हॉर्टिकल्चर मिस्त्री या कार्यालयाकडे काम करणारे सेवक वृंद तसेच वृक्षप्रेमी नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.