_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune News : करा तयारी, गड किल्ल्यांवरील ट्रेकिंगला परवानगी

एमपीसी न्यूज  : कोविड १९ च्या पार्श्‍वभुमीवर संपुर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. कोविडचे प्रमाण कमी होत असल्याने सरकारने एका- एका क्षेत्राला परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या गिर्यारोहणाला ही परवानगी मिळाली असून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

 

महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ संस्थेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे निवेदन सादर केले होते. या निवेदनामध्ये गिर्यारोहण व इतर साहसी खेळांच्या वृद्धीसाठी अविरतपणे काम करणारी संस्था आहे. ज्या प्रमाणे धरण परिसरातील पर्यटन निर्बंध हटविण्यासंदर्भात प्रशासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत.

 

_MPC_DIR_MPU_II

त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील गड किल्यांवर, कातळकड्यांवर गिर्यारोहण, ट्रेकिंग करण्यासंबंधी प्रशासनाची परवानगी प्रकाशित केल्यास साहसवीरांना हुरूप येईल. गिर्यारोहण व साहसाचे माहेरघर पुन्हा एकदा खुलेल’ अशी विनंती करण्यात आली होती.

 

या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी गड किल्ल्यांवरील ट्रेकिंगला परवानगी दिली आहे. परंतु, ही परवानगी देताना काही नियम घालून देण्यात आले आहेत. त्यामध्ये कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरुपात पुणे जिल्हयातील गड किल्यांवर, कातळकड्यांवर गिर्यारोहण, ट्रेकिंग साठी जाताना एका ग्रुपमध्ये १५ पेक्षा जास्त सदस्य नसावेत तसेच ट्रेकिंगसाठी येणा-या प्रत्येक नागरिकाचे थर्मल स्क्रिनिंग करणेत यावे, अधिक संख्या असल्यास वेगवेगळे ग्रुप करुन वेळेमध्ये फरक ठेवावा, ट्रेकिंगसाठी प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक राहील, सहभागी व्यक्तींनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहिर केलेल्या सूचनांनुसार योग्य ते शारिरिक अंतर राखणेबाबतचा नियम काटेकोरपणे पाळणेत यावा, दहा वर्षांचे आतील तसेच पासष्ट वर्षावरील व्यक्तींना सहभाग देऊ नये, ताप, सर्दी खोकला इ. कोरोना सदृश्य लक्षणे असणा-या व्यक्तींना सहभाग देऊ नये, स्थानिकांच्या घरात भोजन, मुक्काम इ.करु नये, एकमेकांच्या वस्तू हाताळू नयेत आदि सूचना देण्यात आल्या असून या सूचनांचे उल्‍लंघन केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आलेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.