Pimpri : कार्टून्सच्या राख्यांचा ट्रेंड 

एमपीसी  न्यूज –   भाऊ-बहिणीचे नाते आणखी दृढ करणारी राखीपौर्णिमा काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने बाजारात राख्यांचे विविध प्रकार दाखल झाल्याचे दिसत आहेत. त्या-त्या वर्षी गाजलेला ट्रेंड राख्यांमध्ये दिसून येत असतो. यंदाही या वर्षात गाजलेले गेम, चित्रपट, कार्टून्स यावर आधारित राख्यांची चलती दिसून येत आहे.

श्रावण पौर्णिमेला साजरी केल्या जाणाऱ्या राखीपौर्णिमेला बहीण आपल्या भावाचे औक्षण करून त्याला राखी बांधते. म्हणून या सणाचे भाऊ-बहिणीला मोठे आकर्षण असते. वर्षातून एकदा येणाऱ्या या सणानिमित्त आपल्या भावाला आकर्षक व नवीन पद्धतीची राखी घ्यावी, याकडे महिला, मुलींचा कल असतो. हा कल ओळखून बाजारात विविध प्रकारच्या राख्या विक्रेत्यांनी दाखल केल्या आहेत. यामध्ये राजवाडी राखी हा नवीन ट्रेंड बाजारात दिसुन येत आहे.

रक्षाबंधनाच्या गाणी असणा-या राख्या यावर्षी बाजारात आल्या आहेत . त्याच्या किंमती दहा रुपयांपासून ते 70 रुपयांपर्यंत आहेत. तसेच आकर्षक रंग संगती व हस्तकलेचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या राख्या हे वैशिष्ट्य आहे. तसेच अमेरिकन डायमंड हा प्रकार सध्या पसंतीस उतरत आहे.   लुंबा, लटकन, भैय्या भाभी, जरदोसी वर्क, स्टोन राखी, बाहुबली, मोटू-पतलू, हनुमान, श्रीगणेश, डोरेमॉन, लॉरेन अँड हार्डी अशा कार्टूनच्या राख्यांचा समावेश आहे. डिझाइन नसलेल्या राख्यांच्या किंमती १५ ते २० रुपयांपासून मिळत असून आकर्षक कलाकुसर, साहित्य वापरलेल्या राख्या ६० रुपयांपासून सुरू होत आहे. पुढे थेट हजार रुपयांपर्यंतही राख्या बाजारात मिळत आहेत.

अनेकींना आपल्या भावासाठी दुसऱ्या गावी किंवा देशात राखी पाठवायची असल्याने राखीपौर्णिमेच्या आठ-पंधरा दिवसांपूर्वीच राख्या खरेदीला सुरुवात केली जाते. अशा महिलांची राख्या खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसून येत आहे. ही गर्दी पुढच्या आठवड्यापर्यंत वाढेल, असे मत राखी विक्रेते यानिमित्त व्यक्त करीत आहेत.
राख्यांवर नेत्रदानाचा संदेश ही पिंपरीतील विक्रेत्या श्री महावीर राखीच्या संचालिका सीमा कुंकलोळ यांनी दिला. आहे. नेत्रदानांबाबत समाजात जनजागृती व्हावी यासाठी साते ते आठ महिन्यांपासून महिला व अंध बांधवांचा हातभार मोठ्या प्रमणात आहे. हस्तकलेतल्या या राख्यांना चांगली मागणी असल्याने अनेक ग्राहक अशा राख्यांना पसंती देत आहे.

ऑनलाइन मार्केट जोरातप्रत्यक्ष जाऊन कोणतीही वस्तू घेण्यापूर्वी आज अनेकजण ऑनलाइन ती वस्तू किती रुपयांना मिळत आहे व त्यामध्ये किती प्रकार उपलब्ध आहे, याची माहिती घेताना दिसतात. राख्यांबाबतही तसे होत असल्याचे चित्र दिसून येत असून अशा ग्राहकांसाठी अनेक ऑनलाइन वेबसाइट्सवर राख्यांची मोठी व्हरायटी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय, परदेशात राख्या पाठविण्याचा पर्यायही त्यांच्यासाठी खुला करण्यात आला आहे. मिठाई, चॉकलेट्स, राखी यांचे एकत्रित पॅकेजेसही येथे कंपन्याकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे महिला येथे खरेदीला प्रतिसादही देत आहेत. याचा मात्र स्थानिक राखी विक्रेत्यांवर परिणाम होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.