Pune : सर्वपक्षीय नेते आणि पुणेकरांनी वाहिली अटलजींना श्रद्धांजली !

एमपीसी न्यूज – भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्टला प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जाण्याने देशभरातून शोक व्यक्त होत असताना पुण्यात सुद्धा सर्वपक्षीय नेते आणि पुणेकरांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे , खासदार नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, काँग्रेसचे शहाराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष  राजेंद्र पाटील, काँग्रेसचे नेते मोहन जोशी, शरद काळे, शरद रणपिसे , योगेश टिळेकर, राहुल सोलापूरकर, चंद्रकांत मोकाटे बाबू वागस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांच नात वेगळं होत. आता या दोन नेत्यांच्या जाण्याने पोरकं झाल्यासारखं वाटत असल्याची भावना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केल्या.
अटलजींसारखा सत्यवादी आणि निर्भीड विचार असणारा दुसरा नेता मी पाहिला नाही तर अशक्याला शक्य करणारा नेता आपल्यातून हरपल्याच्या भावना काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केल्या .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.