Tribute to Martyrs : देशाच्या सन्मानासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या जवानांना बॉलिवूडचा सलाम

Tribute to Martyrs: Bollywood salutes soldiers who sacrificed their lives for the honor of the country ‘उरी’ फेम अभिनेता विकी कौशल बरोबरच अमिताभ बच्चन, अक्षयकुमार, अजय देवगण, हृतिक रोशन, अनुपम खेर. सोनू सूद, तमन्ना भाटिया आदी कलाकारांनी देखील श्रद्धांजली अर्पण केली आहे.

एमपीसी न्यूज – सध्या देशात करोनाच्या साथीने थैमान घातले असताना तिकडे सीमेवर कुरबुरी सुरुच आहेत. प्रत्यक्ष ताबारेषेचा (LAC) वाद चीनकडून उकरुन काढला जात आहे. लडाख येथील पेन्गॉंग लेकजवळील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले. भारत-चीन संघर्षात चीनच्या सैनिकांचीही मोठी हानी झाली आहे.

भारतीय लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे 43 सैनिक या संघर्षांत ठार झाले आहेत. या घटनेवर ‘उरी’ फेम अभिनेता विकी कौशल याने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने भारतीय सैनिकांचे कौतुक करत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘गलवान खोऱ्यात जीवाची बाजी लावून लढणाऱ्या भारतीय सैनिकांना सलाम. देशाच्या सन्मानासाठी तुम्ही प्राणांचे बलिदान दिले. तुमच्या कुटुंबियांसाठी मी दु:ख व्यक्त करतो. जय हिंद’. अशा आशयाचे ट्विट करुन विकी कौशल याने भारतीय शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

विकी कौशल व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, अक्षयकुमार, अजय देवगण, हृतिक रोशन, अनुपम खेर. सोनू सूद, तमन्ना भाटिया आदी कलाकारांनी देखील श्रद्धांजली अर्पण केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

प्रत्यक्ष ताबारेषेवर तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरु आहेत. त्या सुरु असतानाच ही चकमक झाली आणि त्यात जवानांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढला आहे. चीनच्या सीमेवर अशा प्रकारे भारतीय जवान शहीद होण्याची अशी घटना 1975 तर प्रथमच घडली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.