Talegaon News : जागतिक मराठी भाषा दिनी विविध नाट्य प्रवेशा द्वारे कलापिनी कलाकारांचे माय मराठीला वंदन 

एमपीसी न्यूज : जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून कलापिनीच्या युवा व प्रौढ कलाकारांनी आपली नाट्यकला सादर करून मराठी भाषेला वंदन केले. कलापिनीचे युवा कलाकार प्रतिनिधी शार्दुल गद्रे, आदित्य धामणकर, कलापिनीचे विश्वस्त डॉ.अनंत परांजपे, उपाध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे, कार्यकारिणी सदस्य विनायक भालेराव, खजिनदार श्रीशैल गद्रे, जेष्ठ कलावंत, लेखक डॉ. जयंत जोर्वेकर व कलापिनीच्या नवीन रंगमंचासाठी देणगी देणारे रसिक प्रेक्षक मोहन काळेकुंद्री यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

ज्ञानपीठ पारितोषिक विजेते लेखक वि. वा. शिरवाडकर लिखित ‘कौन्तेय’ नाटकातील प्रवेश मुग्ध जोर्व्हेकर व संदीपसमर्थ मन्वरे यांनी आपल्या साकार करून कुंतीचे पुत्रप्रेम व मातृ सुखाला पारखा झालेल्या कर्णाची व्यथा मांडली कुंती आणि कर्ण या दोघांची ही घुसमट प्रभावी पणे सादर करण्याचा एक चांगला प्रयत्न रसिकांना पाहायला मिळाला या नाट्य प्रवेशाचे दिग्दर्शन तळेगावातील जुने जाणते जेष्ठ दिग्दर्शक, लेखक डॉ.जयंत जोर्वेकर यांनी केले होते. रंगभूषा शामली देशमुख व  मुक्ता भावसार यांची तर साजेसे पार्श्वसंगीत शार्दूल गद्रे याचे होते.

या नंतर आपल्या अभिनय व दिग्दर्शन कौशल्या  मुळे कलापिनीची काही दशके गाजविणाऱ्या व ज्यांच्या अभिनय कौशल्याची तळेगावकर रसिक आतुरतेने वाट पाहत असतात त्या डॉ.अनंत परांजपे यांनी दिग्दर्शित व अभिनित केलेला नाट्य प्रवेश ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ प्रेक्षकांना सुखावून गेला पती पत्नीच्या नात्यातील मिश्कील पणा,आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर दिलेली चुकांची कबुली व त्या बाबतीतही एकमेकांवर केलेली कुरघोडी रसिकांची दाद मिळवून गेली त्यांना तेवढीच सुंदर साठी डॉ.अश्विनी परांजपे यांनी केली व सादरी करणातील गंमत वाढवली. दोघांचाही उत्तम अभिनय रसिकांना सुखावून तर गेलाच पण नवीन कलाकारांना बरच काही शिकवणारा होता. शार्दूल गद्रे याचे पार्श्वसंगीत सादरीकरणाची रंगत वाढवणारे होते.

यानंतर कलापिनीच्या युवा कलाकारांनी प्रा.दिलीप परदेशी लिखित ‘म्हाराज म्येले’ राजकारणावर भाष्य करणारी एकांकिका सादर केली. राजकारणात सामान्य माणसाचाच बळी जात असतो हे त्रिकालाबाधित सत्य या एकांकिकेत विनोदी ढंगात माडले होते युवा कलाकारांचा जोश,चांगले टीम वर्क व त्याला मिळालेली सर्वांच्या अभिनयाची साथ या मुळे प्रयोग छान रंगला प्रणव केसकर याचे  उत्तम पार्श्व संगीत व त्यांना मिळालेली अजय शिंदे (ढोलकी), प्रदीप जोशी (संवादिनी) व अनिरुद्ध जोशी  यांची तितकीच सुंदर साथ यामुळे एकांकिकेची रंगत वाढली.

या एकांकिकेचे दिग्दर्शन आदित्य धामणकर याचे होते यातील शार्दूल गद्रे, आदित्य धामणकर, डॉ.सावनी परगी यांच्या भूमिका उल्लेखनीय होत्या. यातील इतर कलाकार राजीव कुमठेकर, हरीश पाटील, चेतन पंडित, ज्ञानेश्वर शिंदे,वेदांग महाजन, सोहम पवार, दिपाली जोशी, विनया केसकर, प्रतीक मेहता ,चैतन्य जोशी होते तर नेपथ्य नेपथ्य – चैतन्य जोशी नेपथ्य सहाय्य – अदिती आपटे , प्रतीक मेहता तर संघप्रमुख – श्रीधर कुलकर्णी , प्रतीक मेहता होते, प्रकाशयोजना – सायली रौन्धळ , स्वच्छंद गंदगे यांची होती याचे लवकरच दोन अंकी नाटक सादर होणार आहे. संपूर्ण कार्यक्रमाची रंगत वाढवणारे व अभ्यासपूर्ण व मराठी भाषेची महती सांगणारे उत्तम निवेदन माधुरी कुलकर्णी केले.

उत्तम ध्वनी व्यवस्था सुमेर नंदेश्वर यांची होती कलापिनीच्या कलाकारांनी मराठी भाषेतील विविध शैली दाखविणाऱ्या नाट्य प्रवेशांचे सादरीकरण करून केले वंदन मराठी भाषेला व तिच्यावर मनापासुन प्रेम करणाऱ्या रसिकांना नक्कीच सुखावून गेले असतील .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.