Pimpri : नागरिक सेवा प्रतिष्ठानतर्फे शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली

एमपीसी न्यूज – नागरिक सेवा प्रतिष्ठान आणि नगरसेवक राहुल भोसले यांच्या वतीने काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना विठ्ठलनगर येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप दहाडे, सामाजिक कार्यकर्ते किशोर गवळी, शिवशंकर उबाळे, राम बनसोडे, तिम्माशेठ टाकळे, फारूक इनामदार, सचिन शिंदे, पांडुरंग डोंगरे, नवनाथ कांबळे, विनोद शिखरे, नितीन कसबे, चंद्रकांत लोंढे आदी उपस्थित होते. पाकिस्तानविषयी चीड व्यक्त करत या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. ‘भारत माता कि जय’ आणि ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. सर्वांनी काही वेळ मौन पाळून आणि मेणबत्ती प्रज्वलित करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यामुळे भारतामध्ये संतापाची लाट उसळली आहे. तब्बल 350 किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी (दि. 14) पुलवामा जिल्ह्यात भीषण आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 40 जवान शहीद झाले आहेत. सुट्टी संपवून सेवेत रुजू होणाऱ्या 2 हजार 547 जवानांना 70 वाहनांतून नेले जात होते. प्रत्येक वेळी एक हजार जवानांना नेले जाते, पण यावेळी ही संख्या दुपटीपेक्षा जास्त होती. पहाटे साडेतीन वाजता जम्मूहून हा ताफा निघाला आणि सूर्यास्ताआधी तो श्रीनगरला पोहोचणे अपेक्षित होते. श्रीनगर-जम्मू महामार्गावर अवंतीपुरा येथील लट्टूमोड येथे हा ताफा पोहोचला असताना हा हल्ला झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.