Vinayak Mete : विनायक मेटे यांना मावळ भाजपकडून श्रद्धांजली

एमपीसी न्यूज – माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर रविवारी (दि. 14) पहाटे अपघाती निधन झाले. त्यांना भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी सदैव लढा दिला. शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांच्या निधनाने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.