Chinchwad : रविवारी चिंचवडला रंगणार त्रिवेणी संगम सोहळा

एमपीसी न्यूज – कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या वतीने उद्या, रविवारी (दि. 24) त्रिवेणी संगम 2019 या मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पु.ल.देशपांडे, बाबूजी आणि ग.दि.माडगुळकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती कलारंग संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी दिली.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी साडेअकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी अतुल परचुरे यांच्याशी पु. ल.या विषयार गप्पा होणार आहेत. अतुल परचुरे यांच्याशी बातचीत करणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, आमदार लक्ष्मण जगताप, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, महापौर राहूल जाधव, उमा खापरे, राजेंद्र घावटे, पितांबर लोहार, भालचंद्र मगदुम, राज अहिरराव, सुरेश पाटोळे यांची उपस्थिती असणार आहे.

यावेळी स्वप्नजा लेले, संदीप उबाळे यांच्या सुमधुर गायनांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. त्यांना केदार परांजपे, अमित कुंटे, रोहन बनगे, अपूर्व द्रविड हे साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन रवींद्र खरे करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.