Pune News : दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात आई-वडीलांसह मुलाचा जागीच मृत्यू झाला. दौंड तालुक्यातील पाटस ते कारखाना या अष्टविनायक महामार्गावर शुक्रवारी हा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण मृत्युमुखी पडले. (Pune News) संतोष सदाशिव साबळे, रोहिणी साबळे आणि त्यांचा चार वर्षाचा मुलगा गुरु साबळे अशी तिघांची नावे आहेत. शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

Pune News : पुण्यातील हडपसर जवळ असलेल्या किर्लोस्कर ब्रिजवर पहाटे भीषण अपघात

याप्रकरणी अधिक माहिती अशी की पाटस येथील रहिवाशी संतोष साबळे हे दुचाकीने कुटुंबीयांसह जात होते. पुसेगाव येथील भानोबा देवाचे दर्शन घेऊन ते घरी परतत होते.(Pune News) यावेळी त्यांच्या दुचाकीला पाण्याच्या टँकरने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे संपूर्ण गावावर शोक काळा पसरली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.