Pune News : ट्रक आणि भिंतीमध्ये चिरडून क्लिनरचा मृत्यू, ट्रक चालक अटकेत

एमपीसी न्यूज : ट्रक चालकाचा हलगर्जीपणामुळे ट्रक पाठीमागे घेत असताना ट्रक आणि भिंतीच्यामध्ये चिरडल्या गेल्यामुळे क्लिनरचा मृत्यू झालाय. मार्केट यार्ड येथील भुसार बाजारात शनिवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. 

श्यामलाल सुकराम सोळंकी (रा राजस्थान) असे मृत्युमुखी पडलेल्या क्लिनरचे नाव आहे. याप्रकरणी ट्रक चालक रामदयाल सिताराम सारंग (वय 35, रा. राजस्थान) याला मार्केटयार्ड पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी धीरज विकास कसबे (वय 19) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मार्केटयार्डातील भुसार बाजारात राजस्थानहुन सामान घेऊन हा ट्रक आला होता. शनिवारी मार्केटयार्ड येथील गोविंददास अँड सन्स गाळा नंबर 462 याठिकाणी हा ट्रक पाठीमागे घेत असताना क्लिनर शामलाल सोळंकी याने ट्रक थांबवण्याचा इशारा केला असतानासुद्धा ट्रक चालक रामदयाल सारंग याने दुर्लक्ष करून निष्काळजीपणाने ट्रक पाठिमागे घेतला.

यावेळी बीट आणि ट्रक यांच्यामध्ये श्यामलाल सोलंकी सापडला आणि चिरडला गेला.  गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.  पोलिसांनी याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास मार्केटयार्ड पोलीस करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.