-MPC-TOP-MOST-BANNER-I

Chinchwad : ट्रकच्या काचा फोडणारे टोळके गजाआड

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरुन जमाव जमवून ट्रक चालकाला मारहाण करत तोडफोड करणा-या पाच जणांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

फरदीन बाबर शेख (वय 19, रा. दत्तनगर, चिंचवड), सागर झोरबाडे (वय 21, रा. शंकरनगर, चिंचवड), सुग्रीव काळे, अजय बारसकर (वय-22, रा.चिंचवड), दीपक गिरी (रा. मोरेवस्ती, चिखली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अमित प्रकाश बाबर (वय 35, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांना का बोलावले अशी विचारणा करत जमावाने ट्रक चालक राजेश कुमार साह (वय 24, रा. चिंचवड), परमेश्‍वर श्रीत्मल साव (वय-20) यांना लाकडी दांडक्‍याने व दगडाने मारहाण करत पाच ट्रकची तोडफोड केली होती. निगडी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पी. डी. आरदवाड तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.