Pune Crime News : नवले पुलाजवळ ट्रकची चार वाहनांना धडक; एकजण जखमी

एमपीसीन्यूज : भरधाव वेगातील एका ट्रकने चार वाहनांना धडक दिली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र, एक जण जखमी झाला असून त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई – बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ आज, सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

कर्नाटक येथून मुंबईच्या दिशेने तांदळाची पोती घेऊन निघालेल्या मालवाहू ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर या ट्रकने समोरील चार वाहनांना धडक दिली.

ट्रकचा वेग जास्त असल्यामुळे समोर आलेल्या चार ते पाच गाड्या अक्षरशः फेकल्या गेल्या. पुढे जाऊन एक दुचाकी त्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने ट्रकचा वेग कमी झाला. या अपघातात दुचाकीस्वाराला किरकोळ जखम झाली.

दरम्यान, पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक आणि इतर वाहने रस्त्याच्या कडेला नेण्यात आली.

अपघातानंतर मुंबई -बंगळूर महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. दूरवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III