Chakan News : शिक्रापूर-चाकण रोडवर ट्रक-दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

0

एमपीसी न्यूज – शिक्रापूर-चाकण रोडवर शनिवारी रात्री ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

_MPC_DIR_MPU_II

विष्णू भगवानराव शेळके (वय 24, रा. शिक्रापूर, ता. शिरूर) असे मृत्यू झालेल्या दुचाकी स्वराचे नाव आहे. याबाबत गजानन उल्हास मोहिते (वय 23, रा. वाशिम) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक (एम एच 04 / एफ 5528) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ट्रक चालक शिक्रापूर-चाकण रोडने भरधाव वेगात जात होता. त्यावेळी मयत दुचाकीस्वार चाकण-शिक्रापूर मार्गावरून जात होता. खेड तालुक्यातील कडाचीवाडी येथे आल्यानंतर ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार विष्णू याचा जागीच मृत्यू झाला. तसेच या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment