Pune : पेट्रोलचे पेटते गोळे टाकून घर पेटवण्याचा प्रयत्न; घटना सीसीटीव्हीत कैद

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गुन्हेगारांनी काल पहाटे एका घरावर पेट्रोलचे पेटते बोळे टाकून घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर पार्क केलेल्या 4 दुचाकी सीसीटीव्हीची तोडफोड करून परिसरात दहशत पसरवली. ही घटना कोथरूडमधील शास्त्रीनगर येथील पीएमसी कॉलनीत घडली.

कोथरूड पोलिसांनी दादा कुंडले व त्याचा साथीदार साळवी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कुंडले याचे चुलते व या ठिकाणी राहणाऱ्या महिलेचे पूर्वी भांडण झाले होते. त्यामुळे हे दोघे या पीएमसी कॉलनीत येऊन गाड्याची तोडफोड केली व सीसीटीव्हीही फोडले. मात्र, तरी त्यांचे कृत्य त्या परिसरातील एका सीसीटीव्हीत कैद झाले आहे. कोथरूड पोलीस या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.