Pune : पूर्ववैमनस्यातून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि. 2) रात्री सव्वाअकराच्या सुमारास सिंहगड रोड येथील दांडेकर पुलाजवळ घडली आहे.

केतन चंद्रकांत ननावरे(वय 23, रा. दांडेकर पूल) असे यातील जखमी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी जखमीची आई छाया चंद्रकांत ननावरे (वय 55, रा. दांडेकर पूल) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी छाया ननावरे यांचा मुलगा केतन हा रात्री उशीरा त्याची दूचाकी पार्क करून घरी आला असता त्याच्या घराशेजारी राहणा-या इसमाने त्या दोघांमध्ये यापूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून केतनला शिवीगाळ करून लोखंडी वस्तूने गळ्यावर आणि शरीरावर वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

या वारांमुळे केतन गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील आरोपी फरार झाला असून त्याचा शोध दत्तवाडी पोलीस घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.