Bhosari Crime News : तलवार गळ्याला लावून चिकन दुकानदाराला लुटले

गाडीच्या काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज : ‘मी भोसरीचा दादा आहे, मला कुणी नडायचं नाही’ असे म्हणत चार जणांच्या टोळक्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. तसेच चिकन दुकानदाराच्या गळ्याला तलवारी सारखं हत्यार लावून दोन किलो चिकनची मागणी केली व बळजबरीने दोन हजार रुपये घेतले. रस्त्यावरील गाड्यांच्या काचा फोडून भिती निर्माण केली. रविवारी (दि. 07) रात्री साडे आठच्या सुमारास सखुबाई उद्यान जवळील रमजान चिकन सेंटर येथे हि घटना घडली. 

याप्रकरणी शमशुजजोहा जमाद शेख (वय 22, रा. भोसरी, मुळगाव – मुर्शिदाबाद, कोलकाता) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण राठोड, करण राठोड, अभिजित नलावडे व आणखी एकजण विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांच्या चिकन दुकानात बळजबरीने घुसले. त्यांनी फिर्यादी यांच्या गळ्याला तलवारी सारखं हत्यार लावून दोन किलो चिकनची मागणी केली व बळजबरीने दोन हजार रुपये घेतले. दुकानदाराचे अंड्याचे ट्रे फोडले व रस्त्यावरील गाड्यांच्या काचा फोडून भिती निर्माण केली.

‘मी भोसरीचा दादा आहे, मला कुणी नडायचं नाही’ असे म्हणत भागात दहशत माजण्याचा प्रयत्न केला. भितीने आसपासच्या दुकानदारांनी दुकानं बंद केली व लोक पळून जाऊ लागले. काही काळ परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कैलासे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.