Pune : दिलीप कांबळे यांच्या फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – वानवडी परिसरातील राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा परमारनगरच्या एचबिल्डिंग मधील फ्लॅटसह चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री 3 फ्लॅट फोडून घरफोडी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी (दि. 17) दुपारी 3 च्या सुमारास उघडकीस आली. 

वानवडी परिसरातील परमारनगर येथील राज्यमंत्री दिलीप कांबळे  यांचा पहिल्या मजल्यावर फ्लॅट आहे तो  गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजल्यानंतर बंद होता. चोरट्यानी कटरच्या मदतीने कांबळे यांच्या शेजारी असलेल्या दोन फ्लॅटमध्ये देखील चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना येथे एच बिल्डिंगमध्ये काम करणाऱ्या एका महिलेला समजली. तिने तेथील वाचमन ला ही घटना सांगितली. शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दुपारी 3 च्या सुमारास समजली. नियंत्रण कक्षाने लागलीच ही घटना वानवडी पोलिसांना कळवली. तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तरी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम सूरु केले आहे.

राज्यमंत्री  दिलीप कांबळे यांच्या फ्लॅटसह आणखी तीन फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न झालेला असून आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरी याबाबत पुढील तपास वानवडी पोलीस व दरोडा प्रतिबंधक पथकाचे अधिकारी करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.