Pune : कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्युज- वारजे माळवाडी येथे तीन अज्ञात इसमानी कोयत्याने ओंकार लामकाणे( वय 20, राहणार वारजे माळवाडी ,पुणे) यांच्या अंगावर वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (11 ऑगस्ट) रात्री साडेआठ च्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार ओंकार लामकाणे (वय 20) यांना त्यांच्या घरासमोर तीन अज्ञात व्यक्तींनी डोक्यावर, कानाच्या वर, तसेच मनगटावर कोयत्याने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच दत्ता ढोकणे यांना देखील हाताने मारहाण केली. आरोपींना अद्याप अटक झालेली नसून याबाबतचा पुढील तपास वारजे पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.